महिला व बाल विकास विभाग महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे – 09
सरळसेवा भरती जाहिरात क्रमांक ०१/२०२४ आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील
गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील
(१) संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित) – २ पदे
(२) परिविक्षा अधिकारी, गट क – ७२ पदे
(३) लघुलेखक ( उच्चश्रेणी) गट क १ पद
(४) लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क – २ पदे
(५) वरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहायक, गट-क – ५६ पदे
(६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क – ५७ पदे
(७) वरिष्ठ काळजी वाहक गट-ड ४ पदे
(८) कनिष्ठ काळजी वाहक गट-ड – ३६ पदे
(९) स्वयंपाकी गट-ड- ६ पदे
इत्यादी भूतपुर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सरळसेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर सरळसेवा भरती प्रक्रियेशी संबंधित सविस्तर जाहिरात व ऑनलाइन अर्ज भरण्याबाबतची सुविधा महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे च्या https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर दिनांक १४-१०-२०२४ पासून उपलब्ध होणाऱ्या लिंकवर उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाइन पध्दतीनेच अर्ज सादर करावेत. प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता केवळ उक्त संकेस्थळावरुन ऑनलाइन पध्दतीने भरलेला अर्ज व ऑनलाइन पध्दतीने भरण्यात आलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज / परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाही.
भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व कार्यक्रम वेळापत्रक, वेळापत्रकातील बदल इत्यादी सूचना https:// www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही स्वतंत्रपणे व्यवहार करण्यात येणार नसून सदर संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.
उक्त भरती प्रक्रिया / परिक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, त्यामध्ये अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण किंवा संवर्गनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे, सामाजिक, समांतर, दिव्यांग व इतर आरक्षणामध्ये संवर्गनिहाय / पदनिहाय बदल करण्याचे, सरळ भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे/नव्याने अटी व शर्ती समाविष्ट करण्याचे/अटी व शर्ती रद्द करण्याचे सर्व अधिकार आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राखून ठेवले असून त्यांचा निर्णय अंतिम असेल. तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात वाद, तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राहतील. त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Post Details
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरवात दिनांक | दिनांक १४-१०-२०२४ दुपारी १५.०० वाजे. पासून |
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक ०३-११-२०२४ रात्री २३.५५ वाजे. पर्यंत |
सविस्तर जाहिरात | https://www.wcdcommpune.com |
ऑनलाइन अर्ज | https://www.wcdcommpune.com |
Answer key | |
ऑनलाइन निकाल |
